Bangalore Crime : मराठी गाण्यामुळे केली हत्या, बंगळुरू हत्याप्रकरणी धक्कादायक सत्य समोर
बंगळुरू येथील एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणाऱ्या राकेश खेडेकरने त्याचीच पत्नी गौरी खेडेकरची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पत्नी व पत्नी यांच्यामध्ये भांडण झाल्याने राकेशने गौरीची चाकूने वार करुन हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून ठेवला. दरम्यान त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचादेखील प्रयत्न केला. मात्र आता या प्रकरणाबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. राकेशकडून गौरीची हत्या करण्यामागचं कारण उघडकीस आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 26 मार्च रोजी राकेश आणि गौरी यांनी संध्याकाळच्या वेळेस एकांतात त्यांचा वेळ घालवला. त्यानंतर दारू आणि नाश्ता खरेदी केला आणि ते घरी पोहचले. त्यानंतर राकेश मद्यपान करीत असताना गौरी तिच्या आवडीची मराठी गाणी ऐकत बसली होती. यानंतर तिने वडील आणि मुलाच्या नात्यावर एक गाण लावलं आणि ते गाण ऐकत तिने राकेशला डिवचलं आणि त्याची खिल्ली उडवली.
त्याच्या चेहऱ्याजवळ जाऊन मस्करीत गाल फुगवले. या गाण्यांमध्ये वडील मुलाच्या नात्याबद्दल काही टिप्पण्या होत्या. ज्यामुळे राकेशचा संताप उडाला आणि त्याने रागाच्या भरात तिला स्वयंपाक घरात ढकललं. त्यानंतर दोघांमध्ये भांडण झाली आणि त्याने चाकूने तिच्यावर वार केले. राकेशचं असं म्हणणं होतं की, त्याची पत्नी गौरी नेहमीच त्याच्या आई-वडिलांबद्दल आणि बहिणीबद्दल वाईट बोलायची. ती त्याच्या कुटुंबाचा नेहमी अपमान करायची असं त्यांने पोलीस तपासामध्ये सांगितला आहे.