Myanmar Air Strike : म्यानमारच्या लष्कराचा आपल्याच नागरिकांवर जीवघेणा हल्ला! एअर स्ट्राइकमध्ये 6 मुलांसह 27 निष्पाप नागरिक ठार
म्यानमार हा आपला शेजारी देश असून तो पुन्हा 1 फेब्रुवारी 2021 म्यानमारमधील लष्कराने आंग सान सून ची की यांचं सरकार पाडलं आणि देशाची सत्ता तेव्हा पासून लष्करशाहीच्या ताब्यात गेली आणि तो देश पुन्हा अस्थिर झाला आहे. यानंतर देशभर मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली शांततेत झालेली निदर्शने तिथल्या लष्करशाहीने लपवली.
यानंतर तेथील लोकांनी शस्त्रे हाती घेतली त्यामुळे देशभर लोकशाही समर्थक सशस्त्र बंडखोरांचे गट तयार झाले असून ते लष्करशाहीशी प्राणपणाने लढत आहेत. या गटांनी देशभरातील अनेक गावे ताब्यात घेतली असून अशाच एका गावावर लष्कराने शनिवारी हवाई हल्ला करून आपल्याच नागरिकांना जीवे मारलं आहे.
या हल्ल्यात 6 मुलांसह एकूण 30 जण मृत्यूमुखी पडले आहेत. मंडाले हे म्यानमारमधील दुसरं सर्वात मोठं शहर आहे. मंडाले शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंगू शहरातील लेट पान या गावावर लष्करांनी हल्ला केला. या हल्ल्यात 27 नागरिकांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत.