Nashik : "तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिविलला भेटल हॅशटॅग नाशिक" दहशत माजवणाऱ्या रील्समुळे तरुणींवर नाशिक पोलिसांची कारवाई; Viral Video

Nashik : "तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिविलला भेटल हॅशटॅग नाशिक" दहशत माजवणाऱ्या रील्समुळे तरुणींवर नाशिक पोलिसांची कारवाई; Viral Video

गुन्हेगारी घटनांवर आधारित रिल्स वायरल करणाऱ्या तरुणानंतर आता नाशिक पोलिसांनी काही तरुणींवर देखील कारवाई केली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

गुन्हेगारी घटनांवर आधारित रिल्स वायरल करणाऱ्या तरुणानंतर आता नाशिक पोलिसांनी काही तरुणींवर देखील कारवाई केली आहे. दोन मुलींनी धमकी देणारा रील तयार करून तो व्हायरल केला होता. याच संदर्भात पोलिसांनी या दोन्ही मुलींना ताब्यात घेत कारवाई केली आहे.

"हे नाशिक आहे भावा तु येथे इज्जत दिली तर तुला इज्जतच भेटेल, नाही तर, तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिविलला भेटल हॅशटॅग नाशिक". असं या तरुणीने आपल्या रीलमध्ये म्हटलं होत. या तरुणींवर दहशतीसाठी रील बनवणे आणि त्याद्वारे लोकांमध्ये भीती निर्माण करणे असे आरोप आहेत.

या मुलींचा शोध घेत पोलिसांनी खाकी दाखवत नाशिक जिल्हा कायद्यांचा बालेकिल्ला असे उद्गार काढलेत. तसेच नाशिक पोलिसांनी गुन्हेगारांचे ऑनलाइन उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही असं देखील स्पष्ट केलं आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com