लोणावळ्यात ओला चालकाची ठेचून हत्या

लोणावळ्यात ओला चालकाची ठेचून हत्या

Published by :
Published on

विरार येथील संतोष झा या ओलाचालकाची कार कांदिवली येथील युसूफ चाऊस आणि मुस्तकीन चाऊस या दोन भावांनी पनवेल येथे जाण्यासाठी बूक केली होती. ते कारने पनवेल येथे गेल्यानंतर त्यांनी लोणावळ्यापर्यंत सोडण्यासाठी संतोष यांना विनंती केली. त्यानुसार संतोषने त्यांना लोणावळ्यात सोडले. तिथे त्यांचे भाड्यावरून भांडण झाले. या भांडणातून दोघांनी संतोष यांची दगडाने ठेचून हत्या केली.

हत्या करून हे दोघे कार घेऊन पसार झाले. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड-गडहिंग्लज रस्त्यावर कार सोडून दिली. मात्र कारला जीपीएस असल्यामुळे दोन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com