Crime
One Rupees Pepsi Alert : चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! तुमच्या मुलांना पेप्सी घेऊन देण्याआधी हा व्हिडीओ नक्की पहा
पेप्सी फॅक्टरीतील अस्वच्छतेचा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही हादराल! मुलांना पेप्सी देण्याआधी हा व्हिडीओ नक्की पहा.
पेप्सी हा सगळ्यांचा आवडता गोड आणि थंडगार पदार्थ आहे. पेप्सी खाणार का? असं विचारलं तर अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. दरम्यान हीच पेप्सी फॅक्टरीमध्ये कशी तयार होते, हे पाहिलत तर पुन्हा हातही लावणार नाही. पेप्सी फॅक्टरीमध्ये कशी तयार होते याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे पाहून तुमचीही झोप उडेल. व्हायरल व्हिडीओ एक रुपयाची पेप्सी बनविण्याच्या कारखान्यातील आहे. आजूबाजूला इतकी घाण आहे की हा एक प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळच आहे. हे खाल्ल्यावर नक्कीच आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होतील. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.