Crime
Pune Crime : नात्याला काळिमा ! बापनेच केले मुलीवर अत्याचार, पोलिसांची तात्काळ कारवाई
या सगळ्या प्रकारामुळे बापलेकीच्या नात्याला काळिमा फासला गेला आहे.
पुण्यातील स्वारगेट येथील 26 वर्षीय मुलीवरील आत्याचाराची घटना ताजी असतानाच एक अजून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये एका बापानेच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. या सगळ्या प्रकारामुळे बापलेकीच्या नात्याला काळिमा फासला गेला आहे. आई घराबाहेर गेल्यानंतर बापाने घरी असलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले.
पुण्यामधील नांदेड सिटी पोलिस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता 45 वर्षीय बापाला अटक करण्यात आले आहे. बाल हक्क समितीने हा प्रकार उघडकीस आणला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करत नराधम बापाला काल बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आई घराबाहेर गेल्यावर नराधम बाप मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आला आहे.