वारजे माळवाडीत एकाचा खून, तर एक जण गंभीर जखमी

वारजे माळवाडीत एकाचा खून, तर एक जण गंभीर जखमी

Published by :
Published on

पुण्यातील वारजे माळवाडी पोलिस स्टेशनचा हद्दीतून आज पहाटेच्या सुमारास एक खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

राम पूजन महिंद्र शर्मा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्याचा खून करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्याचाच एक मित्र गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, मयत राम पूजन शर्मा आणि त्याचे दोन मित्र वारजे माळवाडी परिसरात एकत्र राहत होते. आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, राम पूजन शर्मा हा मयत झाला. तर यांच्या सोबत असणारा आणखी एक तरुण बेपत्ता आहे. त्यानेच हा खून केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान वारजे माळवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com