Pune Crime : पिपंरीमध्ये थरारक प्रकार!
Pune Crime : पिपंरीमध्ये थरारक प्रकार! मामाने हकालून दिले म्हणून भाच्याने कापले मामाचे दोन हात, नेमकं प्रकरण काय? Pune Crime : पिपंरीमध्ये थरारक प्रकार! मामाने हकालून दिले म्हणून भाच्याने कापले मामाचे दोन हात, नेमकं प्रकरण काय?

Pune Crime : पिपंरीमध्ये थरारक प्रकार! मामाने हाकलून दिले म्हणून भाच्याने कापले मामाचे दोन हात, नेमकं प्रकरण काय?

Pune Crime : मामाने हकलल्याने भाच्याने कापले हात, पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Pimpri-Chinchwad Thergaon Crime : थेरगाव परिसरात डिलिव्हरी बॉयवर Delivery Boy धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करून त्याचे दोन्ही हात जवळपास निकामी केल्याच्या खळबळजनक प्रकार घडला आहे. या तिन्ही आरोपींना जामीन मिळाल्याने नातेवाईकांमध्ये संतापाचा भडका उडाला आहे. पीडिताच्या नातेवाईकांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर जोरदार आंदोलन छेडले असून, पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात पीडिताच्या डाव्या हाताचा पंजा पूर्णतः वेगळा, तर उजव्या हाताचा पंजा अर्धा कापला गेला. एवढे गंभीर गुन्हे घडूनही, दुसऱ्याच दिवशी आरोपींना जामीन मंजूर झाल्यामुळे न्याय व्यवस्थेवर आणि पोलीस यंत्रणेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत. या प्रकरणातील आरोपींची नावे रोहन निमज, शुभम पवार आणि प्रशांत सकट अशी आहेत. पोलिसांनी तिघांनाही अटक केली होती, मात्र नंतर त्यांना जामीन मिळाला. पीडित युवकाच्या घराजवळ राहणाऱ्या मुलीबाबत आरोपी रोहनने वारंवार गैरवर्तन केले होते, ही माहिती पीडित मुलीच्या मामाला मिळाल्यावर त्याने रोहनला जाब विचारला. याचा राग मनात धरून, रोहनने शुभम आणि प्रशांतच्या मदतीने पीडितावर प्राणघातक हल्ला केला.

थेरगावमधील लक्ष्मीबाई बारणे उद्यानाच्या शेजारी ही घटना घडली. आरोपींनी एकत्र येत पीडिताला गाठले. रोहनने धारदार शस्त्राने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र पीडिताने ते टाळले. त्यामुळे शस्त्राचे घाव त्याच्या दोन्ही हातांवर बसले. या हल्ल्यात पीडिताचा डावा हात पूर्णतः आणि उजवा अर्धवट निकामी झाला. या घटनेनंतर वाकड पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. मात्र, आरोपींना लगेचच जामीन मिळाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले. संतप्त नातेवाईकांनी पोलिस आयुक्तालयासमोर आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला. आता वाकड पोलिसांनी नवे प्रयत्न सुरू केले असून, तिन्ही आरोपींना पुन्हा अटक करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तथापि, ही परवानगी मिळेपर्यंत आरोपी पसार होणार नाहीत याची पुरेशी खबरदारी घेण्यात येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेमकं प्रकरण काय?

डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या रोहन घराशेजारी राहणाऱ्या मुलीवर एकतर्फी प्रेम करत असल्याचा संशय होता. सदर प्रकार मुलीच्या मामाला समजली. त्यानंतर मामाने रोहनला हकलून दिले. रोहनच्या मनात मामाबद्दल राग भरला आणि मामाला संपण्याचा कट रचला होता. ठरवल्याप्रमाणे मामाला लक्ष्मीबाई उद्यानच्या बाहेर गाठले. मामावर हल्ला केला. परंतू मामाने तो हल्ला चुकवला पण धारदार शस्त्र मामाच्या हातावर बसले आणि मामाचा हाताचा पंचा हातापासून वेगळा झाला. एवढ होऊन सुद्धा रोहनने दुसरा वार करत मामाच्या उजव्या हाताचा अर्धा पंजा वेगळा केला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी रोहनसह दोन्ही मित्रांना बेड्या ठोकल्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com