Vaishnvi Hagwane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात जालिंदर सुपेकरांवर मोठी कारवाई

जालिंदर सुपेकर यांच्यावर गृहविभागाची मोठी कारवाई
Published by :
Shamal Sawant

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये अनेक माहिती समोर येत आहे. वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी सासू, सासरा, नवरा, नणंद आणि दीर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अशातच वैष्णवी हगवणे प्रकरणात राजेंद्र हगवणेंचे मेहुणे असलेले पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर हे आरोपींना मदत करत असल्याचा आरोप कस्पटे कुटुंबियांनी केल्यानंतर गृहविभागाने सुपेकर यांना दणका दिला आहे.

जालिंदर सुपेकर हे पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे महानिरिक्षक आहेत. त्यांच्याकडे संभाजी नगर , नाशीक आणि नागपुरच्या कारागृह उपमहानिरिक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. हा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. जालिंदर सुपेकर यांच्याकडून हा पदभार काढून घेतल्यानंतर, नागपूरची जबाबदारी उपमहानिरीक्षक स्वाती साठे, नाशिकची जबाबदारी अधीक्षक अरुणा मुगटराव आणि नागपूरची जबाबदारी अधीक्षक वैभव आगे या तीन अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com