Vaishnavi Hagawane Case :  हगवणेंचा 7 दिवस विविध ठिकाणी मुक्काम; नक्की कुठे-कुठे केला प्रवास?

Vaishnavi Hagawane Case : हगवणेंचा 7 दिवस विविध ठिकाणी मुक्काम; नक्की कुठे-कुठे केला प्रवास?

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणासंबंधी फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे सात दिवस विविध ठिकाणी फिरले. यादरम्यान त्यांनी कुठे कुठे मुक्काम केली जाणून घ्या.
Published by :
Prachi Nate
Published on

अटक झाली तरी हगवणेचा उद्दामपणा सुरूच असल्याचं दिसून येत आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या हुंडाबळी प्रकरणासंबंधी फरार आरोपी सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि तिचा दिर सुशील राजेंद्र हगवणे या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक करण्यात आहे. या दरम्यान गेल्या सात दिवसांपासून हे दोघे बापबेटे फरार होते.

सुरुवातीला 7 मे रोजी वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह औंध रुग्णालयात पाहण्यासाठी हे दोघे इंडीवर कारने गेले. त्यानंतर या दोघांना असा संशय आला की, यात आपलं नाव देखील ओढलं जावू शकतं, याची भनक लागातच दोघांनी ही गाडी बदलत आपली ठिकाण बदलली आणि वैष्णवी हुंडाबळी प्रकरणापासून स्वतःला वाचवण्यासाठी तब्बल सात दिवस प्रवास केला.

वैष्णवीच्या आत्महत्येनंतर राजेंद्र हगवणे पुणे, सातारा, कोल्हापुर येथे सात दिवस विविध ठिकाणी मुक्काम केला. ज्यामुळे तो पोलिसांना सापडला नाही. फरार झाल्यानंतर त्याने थार, बलेनो, एन्डेव्हर यांसारख्या आलिशान गाड्यांमधून फिरताना हगवणे बापबेट्याला पळण्यासाठी अनेकांनी मदत केल्याचं पोलिसांनी उघड केलं आहे.

हगवणेचा सात दिवस विविध ठिकाणी मुक्काम

17 मे- औंध हॉस्पिटल, मुहूर्त लॉन्स (थार गाडीने प्रवास), वडगाव मावळ, पवना फार्महाऊस, आळंदी

18 मे- वडगाव मावळ, पवना धरण (बलेनो गाडीने प्रवास)

19 मे- साताऱ्याच्या पुसेगावमध्ये अमोल जाधवच्या शेतावर मुक्काम

19 मे आणि 20 मे-साताऱ्यामधील कोगनोळीच्या हेरिटेज हॉटेलमध्ये मुक्काम

21 मे- कोगनोळीत प्रीतम पाटील नावाच्या मित्राच्या शेतावर मुक्काम

22 मे- पुण्याला परत आला

अखेर त्यांना स्वारगेट परिसरातून अटक करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com