Sahibzada Farhan Asia Cup 2025 Ind vs Pak : "...त्यामुळे लोकांच्या बोलण्याने मला फरक पडत नाही" पाकिस्तान खेळाडूंच्या नापाक हरकतींवर साहिबजादा फरहानने अखेर तोंड उघडलं
रविवारी 21 सप्टेंबरला झालेल्या आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 च्या सामन्यात भारत पाकिस्तान आमने-सामने आले. यादरम्यान पाकिस्तान खेळाडूंचा माजोरडेपणा त्यांनी केलेल्या कृत्यातून पाहायला मिळाला. पाकिस्तानचा खेळाडू साहिबझादा फरहानने अर्धशतक ठोकल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनवरून जोरदार वाद निर्माण झाला आहे. साहिबझादा फरहानने 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि बॅट बंदुकीसारखी धरत गोळ्या झाडल्याची अॅक्शन केली.
त्याने केलेल्या कृतीमुळे भारताच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी असल्याचं म्हटलं गेलं. फरहानवरच्या कृतीने भारतीयांनी संताप व्यक्त करत त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. त्याचसोबत यावर अनेक पाकिस्तान आणि भारतीय खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता यावर स्वत: साहिबजादा फरहानने प्रतिक्रिया देत असं कृत्य करण्यामगचं कारण सांगितल आहे.
साहिबजादा फरहान म्हणाला की, "सामन्यादरम्यान माझ्याकडून जे गन सेलिब्रेशन झालं ते त्या क्षणात हरवून गेल्यामुळे गेल्यामुळे झालं. मी असं कधी 50 धावा काढल्यावर, अर्धशतक केल्यावर फारसं सेलिब्रेशन करत नाही. पण माझ्या अचानक तेव्हा असं मनात आलं की, आपण आज सेलिब्रेशन करावं. माझ्या मनाला वाटलं म्हणून मी ते केलं".
"मग आता त्यावर लोक काय प्रतिक्रिया देतील याचा मी विचार केलाच नाही. तुम्हाला जिथे खेळायचं आहे तिथे आक्रमक होऊन खेळलं पाहिजे, त्यामुळे लोकांच्या बोलण्याने मला फरक पडत नाही" फरहानच्या प्रतिक्रियेमुळे एक गोष्ट लक्षात येते की, एवढं सगळ होऊन देखील त्याचा माज कायम आहे.