Crime
खळबळजनक! दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने बापालाच संपवलं
छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलाने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे बापाचा खून केला. आरोपी नंदू शेषराव चव्हाणला अटक.
छत्रपती संभाजीनगर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोटच्या मुलाने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून बापाचाच खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात असलेल्या वजनापुर शिवारात दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पोटच्या मुलानेच मारहाण करत लोखंडी खुर्ची डोक्यात टाकून बापाचा खून केल आहे. शेषराव रंभाजी चव्हाण वय 80 वर्ष असे वृद्ध वडिलांचे नाव नंदू शेषराव चव्हाण वय 50 वर्ष असे आरोपी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी मुलाला शिल्लेगाव पोलिसांनी अटक करत त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.