Sheena Bora Case : शीना बोरा हत्याकांड खटल्यावर 10 मार्चपासून नियमित सुनावणी

या खटल्याबाबतची शेवटची सुनावणी 23 ऑक्टोबर रोजी झाली होती.
Published by :
Team Lokshahi

शिना बोरा हत्याकांडबाबतची एक नवीन माहिती समोर आली आहे. गेले काही महीने या प्रकरणाची सुनावणी रखडलेली होती. मात्र या खटल्याशी संबंधित काम येत्या सोमवारपासून म्हणजेच 10 मार्च पासून सुरु होणार आहे. या खटल्याचे कामकाज बघणाऱ्या विशेष सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदलीमुळे ही सुनावणी गेल्या चार महिन्यांपासून रखडली होती.

या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, येत्या सोमवारपासून या खटल्याची नियमित सुनावणी होणार आहे. याबद्दलची माहिती सीबीआय न्यायालयाचे नवनियुक्त न्यायाधिश जे.पी. दरेकर यांनी दिली. या खटल्याबाबतची शेवटची सुनावणी 23 ऑक्टोबर रोजी झाली होती. यावेळी सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. नाईक निंबाळकर होते. शिनाची आई इंद्राणी मुखर्जी ही या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तसेच इंद्राणीकहा चालक श्यामवर रायला माफीचा साक्षीदार करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com