Bihar Crime News : बिहारमधली धक्कादायक घटना! सावत्र आईने घेतला चिमुकलीचा जीव, चिमुकलीच्या शरीराचे तुकडे सापडले पोत्यात भरलेले......
एका सावत्र आईने ८ वर्षीय चिमुकलीचा गळा दाबून हत्या केली. ही धक्कादायक घटना बिहारमधील बक्सर या जिल्ह्यातील आहे. चिमुकलीचा पाहिल्यांदा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर चिमुकलीच्या शरीराला जाळले आहे. उर्वरित शरीराचे तुकडे एका पोत्यात भरून घरात लपवून ठेवले होते. अशी भयानक घटना बिहारमध्ये घडली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी सावत्र आईला ताब्यात घेतले आहे.
या घटनेनंतर बक्सर जिल्हा पुर्णपणे हादरलेला आहे. कुटुंबातील इतर व्यक्तीने मुलगी हरवली अशी, तक्रार पोलिस ठाण्यात केली होती. त्यानंतर मुलीचा तपास करण्यास सुरुवात झाली होती. चिमुकलीचा पहिला गळा दाबला, नंतर त्याचा मृतदेह जाळला होता. त्यानंतर चिमुकलीच्या शरीराचे तुकडे हे एका लाकड्याच्या पेटीत पोत्यात भरलेल्या अवस्थेत सापडले गेले होते.
सावत्र आईने तिच्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी सावत्र आईला ताब्यात घेतले असून, चिमुकलीच्या शरीराचे तुकडे हे पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. चिमुकलीचे वडील दिल्लीत राहत होते. या घटनेचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.