शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या; मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या; मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

Published by :
Published on

यवतमाळ | येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या करण्यात आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अशोक पाल असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. यामुळे रुग्णसेवा ठप्प पडली आहे.

अशोक पाल शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या केल्यानंतर एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी रुग्णालयाचे मुख्य गेट बंद केले आणि हत्या करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे अशी त्यांनी मागणी केली आहे. आंदोलन दरम्यान रुग्णांच्या नातेवाईकांना आत जाता येत नाही. बाह्य रुग्ण विभागातही शुकशुकाट दिसून आला. एमबीबीएस अभ्यासक्रमाचा विद्यार्थी होतकरू होता. त्याच्या मृत्यमुळे कुटूंब उघड्यावर पडले आहे. दरम्यान आयएमएकडून मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला तीन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. तर रुग्णवाहिका चालकांनी डॉक्टरांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. परंतु मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com