Pune Crime : प्रॉपर्टीसाठी भावाने नात्याची गरिमा ओलांडली! बहिणीला दिलं वेड्याचं इंजेक्शन आणि...

Pune Crime : प्रॉपर्टीसाठी भावाने नात्याची गरिमा ओलांडली! बहिणीला दिलं वेड्याचं इंजेक्शन आणि...

भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. प्रॉपर्टीसाठी एका भावाने आपल्या सख्ख्या बहिणीला मानसिक रुग्ण ठरवण्याचा कट रचला.
Published by :
Team Lokshahi
Published on

भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे. केवळ मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी एका भावाने आपल्या सख्ख्या बहिणीला मानसिक रुग्ण ठरवण्याचा कट रचला. तिच्या नकळत मानसिक आजाराचं इंजेक्शन देत तिला जबरदस्तीने मानसिक रुग्णालयात भरती करण्यात आलं. ही घटना समजताच संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपी धर्मेंद्र इंदूर रॉय याने आपल्या 56 वर्षीय बहिणीला ब्लड टेस्टच्या बहाण्याने रुग्णालयात नेलं.

मात्र तिथेच तिला वेड्याचे इंजेक्शन दिले गेले आणि ती शुद्धीत असतानाही तिला मानसिक रुग्ण ठरवत एका मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या कृत्यात धर्मेंद्रला चार खाजगी बाऊन्सर्सची मदत मिळाली, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पीडित महिला ही पूर्णपणे मानसिकदृष्ट्या स्थिर असून तिच्यावर कुठलेही आजाराचे लक्षण नव्हते. मात्र, भावाने प्रॉपर्टी मिळवण्यासाठी अमानुष पातळी गाठली.

इतकंच नाही तर धर्मेंद्र रॉय याने आपल्या आई-वडिलांनाही एका आश्रमात सोडलं, जेणेकरून संपूर्ण मालमत्तेवर त्याचा ताबा राहील. शेजाऱ्यांनी हा प्रकार ओळखत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्वरीत कारवाई करत धर्मेंद्र रॉय आणि त्याच्या मदतीला आलेल्या 4 बाऊन्सर्सवर गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com