दोन मजुरांची नवनिर्माण इमारतीत निर्घृण हत्या

दोन मजुरांची नवनिर्माण इमारतीत निर्घृण हत्या

Published by :
Published on

गोंदिया शहरातील सिंधी कॉलोनी येथील एका नवनिर्माण इमारतीमध्ये दोन मजुरांची झोपेतच निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दोन्ही मजुर हे उतर प्रदेश मधील आहेत. अमन आणि निरंजन असे मृतकाचे नाव असून बलवान असे हत्या करून फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. काल रात्री या नव निर्मित इमारतीत चार मजुर झोपले होते. या पैकी दोघांची झोपेतच निर्घुण हत्या करण्यात आली या पैकी एक मजुर घटनास्थळावरून पसार झालेला आहे तर एक मजूर घटना स्थळावर असून याची माहिती परिसरातील लोकांना दिली.

दरम्यान परिसरातील लोकांनी याची माहिती गोंदिया शहर पोलिसांना दिली असून पोलिसांनी घटनस्थळी येऊन पंचनामा करून मृत देह शविछेदन करण्याकरिता पाठविले आहे. घटनास्थळी पोलिस अधिक्षक विश्व पानसरे यांनी घटना स्थळी पाहणी केली असून पुढील तपास गोंदिया शहर पोलिस करीत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com