Chembur Firing : चेंबूरमध्ये बंदुकधाऱ्यांचा कहर! बिल्डरवर जीवघेणा हल्ला तर कारवर गोळ्यांचा मारा

Chembur Firing : चेंबूरमध्ये बंदुकधाऱ्यांचा कहर! बिल्डरवर जीवघेणा हल्ला तर कारवर गोळ्यांचा मारा

चेंबूर फायरिंग: मुंबईतील चेंबूरमध्ये बंदुकधाऱ्यांचा कहर, बिल्डरवर जीवघेणा हल्ला आणि कारवर गोळ्यांचा मारा.
Published by :
Prachi Nate
Published on

मुंबईतील चेंबुर परिसरात एकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई चेंबूरच्या परिसरात भर रस्त्यात दुचाकीवर स्वार असलेल्या दोन अज्ञात आरोपिनी एका व्यक्तीवर गोळीबार केला. मुंबईच्या चेंबूरमधील मैत्रीपार्क भागातील बिल्डवर झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सायन पनवेल हायवेनं जात असताना दुचाकीवर स्वार असलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्या गोळीबार केला. यात एक जण जखमी झाला असून त्याला झेन रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे. दरम्यान स्थानिक पोलीस प्रशासन आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

मुंबईतील गोवंडी पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली असून चेंबूरच्या डायमंड गार्डन सिग्नलजवळ वयवर्ष 50 असलेल्या सद्रुद्दीन खान यांच्यावर गोळीबार झाला. सध्या या जखमीची प्रकृती स्थिर आहे. मुंबई सारख्या शहरात गोळीबाराची घटना घडल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. मुंबईच्या चेंबूर विभागात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com