Ulhasnagar Crime : पालकांनो सावधान ! Summer Camp मध्ये अडीच वर्षाच्या चिमुकल्यावर शिक्षकाने केले अत्याचार

याबद्दल पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून 45 वर्षीय शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
Published by :
Shamal Sawant

उल्हासनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उन्हाळी सुट्टीनिमित्त असलेल्या समर कॅम्पमध्ये एका अडीच वर्षांच्या चिमुकल्यावर डान्स शिकवणाऱ्या शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याबद्दल पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून 45 वर्षीय शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

उल्हासनगर येथे कॅम्प नंबर 4 येथील एका क्लासमध्ये समर कॅम्प आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अनेक लहान मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. त्यानंतर समर कॅम्पमधून घरी आल्यावर एका अडीच वर्षीय चिमुकल्याला शारीरिक वेदना जाणवू लागल्या. पालकांनी याबाबत त्या चिमुकल्याला विचारले असता त्याने डान्स शिकवणाऱ्या शिक्षकाने आपल्यासोबत गैर कृत्य केल्याचे सांगितले. प्रकार ऐकल्यानंतर चिमूकल्याच्या पालकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संबंधित शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोध घेऊन शिक्षक जितेंद्र दुलानी याला अटक केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com