Wardha: वर्ध्यात भीषण अपघात! अवैध दारूची वाहतूक जीवावर बेतली
भूपेश बारंगे वर्धा |
नागपूर जिल्ह्यातून सेलू येथे दुचाकीने अवैधरित्या दारू आणत असताना दुचाकीची अज्ञात वाहनाला धडक बसली या अपघातात एकाच जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा काही भाग चेंदामेंदा झालेला होता. ही घटना मध्यरात्री सुमारास घडली. वैभव हेमराज राऊत व आलोक संतलाल उईके दोघेही सेलू येथील रहवाशी असून अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. नागपूरवरून सेलू येथे अवैध रित्या दारूची वाहतूक करत असताना भरधाव वेगात दुचाकी असल्याने अपघात घडला.
यावेळी दुचाकीचा समोरील भाग चुराडा झाला. या अपघात मृत्यू पावलेले युवक अवैध दारू विक्री करत असल्याची माहीती आहे. नागपूर जिल्ह्यातून अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करत असताना भरधाव वेगाने दुचाकी घेऊन येत असताना अपघात घडला. या अपघात दारूच्या शिष्याचा सडा रस्त्यावर पडला होता. त्यावरून अवैध दारू आणत असताना अपघात घडला असल्याची माहिती समोर आली आहे.
पांढऱ्या रंगांची मोपेड विना नंबरची दुचाकीने अवैधरित्या दारूची वाहतूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.जिल्ह्यात दारूबंदी असताना बाहेरील जिल्ह्यातून रात्रीच्या सुमारास सर्रास दारूची वाहतुक केली जाते. यात विना नंबर चे वाहन वापरून दारूची वाहतूक केल्याचे या अपघातातून उघडकीस आले आहे.रात्रीच्या सुमारास विना नंबर वाहन मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धावत असून यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे.पोलिसांनी तात्काळ याकडे लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी होत आहे.