थोडक्यात
नांदेडमध्ये प्रेम संबंधातून तरुणाची हत्या
प्रेयसीच्या वडील आणि भावाने हत्या केल्याची माहिती
दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
(Nanded) नांदेडमध्ये प्रेम संबंधातून तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नांदेडमध्ये प्रेम संबंधातून 17 वर्षे युवकाची हत्या करुन विहिरीत फेकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील कांडली येथील गावातीलच एका मुलीसोबत त्या तरुणाचे प्रेमसंबंध होते .शनिवारीपासून तो तरुण बेपत्ता होता. पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून मुलीचे वडील आणि भावाला ताब्यात घेतलं त्यानंतर या हत्येचा खुलाचा झाला. याप्रकरणी दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
