Crime
साठगाव येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू
अनिल घोडविंदे (शहापूर) : तालुक्यातील साठगाव गावात खळबळजनक घटना घडली असून गावालगत असलेल्या विद्युत ट्रान्सफार्मर जवळ एका तरुणांचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे. सदर तरुणाचे नाव दिनेश केशव विशे (वय २५) आहे.
तरुणाच्या डोक्यावर व अंगावर जखमा असल्याने दिनेशची हत्या झाली असावी असा संशय त्याच्या कुटुंबियांना आहे. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला असून सदर घटनेचा तपास किन्हवली पोलीस करीत आहेत.