19 वर्षीय नंदिनी गुप्ता बनली मिस इंडिया

19 वर्षीय नंदिनी गुप्ता बनली मिस इंडिया

नंदिनी गुप्ता ब्यूटी पेजेंट फेमिना मिस इंडिया हिची विजेती ठरली आहे.

ब्यूटी पेजेंट फेमिना मिस इंडिया हिची विजेती ठरली आहे. 19 वर्षीय नंदिनी गुप्ताने मिस इंडिया 2023 चा खिताब जिंकला आहे. ब्युटी विथ ब्रेन नंदिनी गुप्ता राजस्थानची रहिवासी आहे. ती देशातील 59 वी मिस इंडिया म्हणून निवडली गेली. या खास प्रसंगी माजी मिस इंडिया सिनी शेट्टीने नंदिनीला मुकुट घातला.

काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये नंदिनीने आपल्या सौंदर्याने आणि आत्मविश्वासाने सर्वांची मने जिंकली. राजस्थानची नंदिनी गुप्ता मिस इंडियाची विजेती ठरली. तर दिल्लीची श्रेया पुजा ही फर्स्ट रनर अप आणि मणिपूरची थौनाओजम स्ट्रेला लुवांग दुसरी रनर अप ठरली.

या सौंदर्य स्पर्धेत देशभरातील मुलींनी सहभाग घेतला होता. मात्र नंदिनीने सर्वांना चीतपट करत 'सौंदर्याचा मुकुट' पटकावला आहे. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी मिस इंडिया बनून नंदिनी अनेक तरुणींसाठी प्रेरणास्थान बनली आहे. मिस इंडिया झाल्यानंतर नंदिनी आता मिस वर्ल्डच्या पुढील सीझनमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

कोण आहेत नंदिनी गुप्ता?

मिस इंडिया 2023 नंदिनी गुप्ता राजस्थानमधील कोटा शहरातील रहिवासी आहे. त्यांनी मॅनेजमेंट व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले आहे. मिस इंडिया ऑर्गनायझेशननुसार, नंदिनी प्रियांका चोप्राला आपला आदर्श मानते. ती अभिनेत्रीपासून खूप प्रेरित आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com