फुकरे 3 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

फुकरे 3 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'फुकरे'हा यशस्वी ठरला असून याचा दुसरा भाग 'फुकरे रिटर्न्स'ने बॉक्स ऑफिस गाजवले होते.

बॉलीवूडमधील बहुप्रतीक्षित आणि कॉमेडी 'फुकरे 3' चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. अशातच, प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल वाढते क्रेझ लक्षात घेता 'फुकरे 3' नवे स्टँडर्ड्स सेट करेल असे म्हणणे योग्य ठरेल.

मृगदीप सिंग लांबाद्वारा दिग्दर्शित तसेच रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट अंतर्गत निर्मित 'फुकरे 3'या सिनेमामध्ये पुलकित सम्राट, वरुण शर्मा, रिचा चढ्ढा, मनजोत सिंग आणि पंकज त्रिपाठी या कलाकारांना पाहायला मिळेल.

'फुकरे'हा यशस्वी ठरला असून, याचा दुसरा भाग, 'फुकरे रिटर्न्स'ने बॉक्स ऑफिस गाजवले होते. तसेच, या चित्रपटाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे डिस्कव्हरी किड्स चॅनलवर 'फुकरे बॉईज' नावाची अ‍ॅनिमेटेड सिरीजही तयार करण्यात आली. ज्याने लहान मुलांसाठी चित्रपटातील अनोख्या पात्रांना टीव्ही स्क्रीनवर पुन्हा जिवंत केले.

फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी सह-स्थापित एक्सेल एंटरटेनमेंटने 'झेडएनएमडी', 'दिल चाहता है', 'डॉन', 'डॉन 2' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसह प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अशातच, सध्या प्रॉडक्शन हाऊस मोस्ट अवेटेड 'जी ले जरा'साठी तयारी करत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com