Admin
मनोरंजन
सतीश कौशिक मृत्यूप्रकरणी एक धक्कादायक खुलासा; पोलिसांना सापडली फार्महाऊसवर औषधे
ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आता त्यांच्या मृत्यूप्रकरणी नवनवीत खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
दिल्ली पोलिसांच्या टीमनं फार्म हाऊसवर जाऊन तपासणी केली असता पोलिसांना काही औषधं' सापडली. असे दिल्ली पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजते. तसेच सतीश कौशिकच्या मृत्यूनंतर फरार झालेल्या उद्योगपतीचीही पोलिसांना चौकशी करायची आहे.
होळीच्या पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांची पोलिसांनी लिस्ट तयार केली असून त्यातील एक उद्योजक सध्या फरार असल्याचं पोलीस सुत्रांनी सांगितलं आहे.