आमिर खानच्या मुलीला बॉयफ्रेंडने केले क्राउडमध्ये केले प्रपोज, व्हिडिओ होतोय व्हायरल
आमिर खानची मुलगी इरा खानने तिचा लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड नुपूर शिकरेसोबत एंगेजमेंट केली आहे. इराने 22 सप्टेंबर रोजी तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. तिने आयर्नमॅन इटलीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये नुपूर गुडघ्यावर बसून प्रपोज करत आहे आणि इराने जागेवरच हो म्हटले आहे.
इराने व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “पोपये - तिने हो म्हटले. इरा- हाय मी हो म्हणाले.” नुपूरने लिहिले, “आयर्नमॅनची एक खास जागा होती जिथे आम्हचे एंगेजमेंट झाली, समजले?.” दोघांच्या पोस्टवरून स्पष्ट होते की दोघांची एंगेजमेंट झाली आहे.
त्याच्या या पोस्टवर अनेक लोक आणि चाहते त्याचे अभिनंदन करत आहेत. अभिनेत्री फातिमा शेख, हुमा कुरेशी, रिया चक्रवर्ती यांच्यासह अनेक सिनेतारकांनी इराला शुभेच्छा दिल्या.
इरा आणि नुपूर गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर फोटो शेअर करून एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात. काही दिवसापूर्वी इराने तिच्या वाढदिवसानिमित्त नुपूरसोबतचे अनेक फोटो शेअर केले होते.