Ajay & Abhishek
Ajay & AbhishekTeam Lokshahi

Abhishek Bachchan : अजयमुळे अभिषेकवर आली ही वेळ, वाचा सविस्तर....

टॅक्सीने हॉटेलमध्ये पोहोचताच अभिषेकला आठवले की त्याने अजय देवगणसाठी रूमही बुक केली नव्हती.
Published by :

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिषेक बच्चन यांचा सिनियर आहे परंतु दोघेही सुरुवातीपासून खूप चांगले मित्र आहेत. अजय देवगण आणि अभिषेक बच्चन दोघेही अनेकदा एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. पण आज आम्ही तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहोत की एक वेळ अशीही आली होती की अजय देवगणमुळे अभिषेक बच्चनला रात्र रस्त्यावर झोपून काढावी लागली होती.

खरंतर अजयची आणि अभिषेकची मैत्री 1998 साली झाली होती. त्यावेळी मेजर साब या चित्रपटाची शूटिंग सुरू होती. या चित्रपटात अभिषेक बच्चन प्रोडक्शन बॉय म्हणून काम करत होता. या चित्रपटाचं एक गाणं ऑस्ट्रियामध्ये चित्रीत होणार होते. प्रॉडक्शन बॉय असल्याने अभिषेक बच्चनला अजय देवगणला विमानतळावरून उचलून हॉटेलमध्ये थांबवावे लागले.

मात्र अजय देवगण हॉटेलमध्ये पोहोचताच तो ड्रिंक घेण्यासाठी खाली गेला आणि त्याने अभिषेकला ड्रिंक ऑफर केली होती मात्र त्याने त्यावेळी नकार दिला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी अजय देवगणने पुन्हा अभिषेकला ड्रिंक ऑफर केली. त्यावेळी अभिषेक म्हणाला की जर मी माझ्या वडिलांना याबद्दल सांगितले नाही तरच मी पिण्यास तयार आहे. यानंतर एका मुलाखतीत अभिषेकने अजय देवगणसोबत ड्रिंक घेण्याचे खरे कारण सांगितले.

अजय देवगणसाठी रूम बुक करायला विसरलो

अभिषेकने सांगितले की प्रॉडक्शन बॉय झाल्यानंतर त्याच्याकडून सतत चुका होत असायच्या. सुरुवातीला तो अजय देवगणला विमानतळावरून हॉटेलपर्यंत नेण्यासाठी कार बुक करायला विसरला होता. त्यानंतर टॅक्सीने हॉटेलमध्ये पोहोचताच त्याला आठवले की त्याने अजय देवगणसाठी रूमही बुक केली नव्हती. यानंतर अभिषेक बच्चनने आपले सामान खोलीबाहेर काढले आणि खोली अजय देवगणला दिली. यामुळे त्यांना ती रात्र हॉटेलबाहेरील फुटपाथवर काढावी लागली.

Ajay & Abhishek
Suniel Shetty Birthday : सुनील शेट्टीला अभिनेता नाही तर खेळाडू व्हायचं होतं, करोडोंच्या संपत्तीचा मालक
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com