स्त्री वेशातील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का? ‘ड्रीम गर्ल २’चा टीझर प्रदर्शित
Admin

स्त्री वेशातील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का? ‘ड्रीम गर्ल २’चा टीझर प्रदर्शित

ड्रीम गर्ल' हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
Published by :
Siddhi Naringrekar

ड्रीम गर्ल' हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 2019 मध्ये 'ड्रीम गर्ल' या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सध्या सोशल मीडियावर हा टीझर चांगलाच व्हायरल होत आहे.

पूजाच्या भूमिकेत बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता दिसणार आहे मात्र टीझरमध्ये त्याचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. ‘ड्रीम गर्ल २’च्या टीझरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या टीझरमध्ये पूजा कॉल सेंटर सोडून थेट ‘पठाण’शी बोलताना दिसत आहे. यात पूजाची भूमिका बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुरानाने साकारली आहे.

'ड्रीम गर्ल 2' या सिनेमात अनन्या पांडे, अन्नू कपूर, मनजोत सिंह, सीमा पहवा, असरानी, राजपाल यादव, परेश रावल आणि अभिषेक बॅनर्जी महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. हा चित्रपट येत्या ७ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com