Actor Prasad Surve
Actor Prasad Surve

अभिनेता प्रसाद सुर्वे बलोच या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत

चित्रपट सृष्टीत नायक जेवढा महत्वाचा आहे तेवढाच खलनायक देखील महत्वाचा असतो. लांबलचक मिशा, पल्लेदार संवाद, विचित्र केशभूषा व वेशभूषा असे खलनायक.....
Published by :
Pankaj Prabhakar Rane

मुंबई : चित्रपट सृष्टीत नायक जेवढा महत्वाचा आहे तेवढाच खलनायक देखील महत्वाचा असतो. लांबलचक मिशा, पल्लेदार संवाद, विचित्र केशभूषा व वेशभूषा असे खलनायक आपण अनेक खलनायक पाहिले आहेत. मात्र बदल्यात चित्रपटाबद्दल खलनायक देखील बदलत गेला आहे. उत्तम देहबोली, दर्जेदार संवाद शैली, नायकाच्या तोडीस तोड दिसणारा मराठी चित्रपटसृष्टीला नवा खलनायक प्रसाद सुर्वे याच्य रूपाने मिळाला आहे.

प्रसादने अभिनयाची सुरुवात 'माकडाचं लगीन' या चित्रपटापासून केली. त्यांनतर परफ्युम, शेर शिवराज, फाईट आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या बलोच चित्रपटात प्रसाद झळकला आहे. सीमा पार देशासाठी लढणाऱ्या मराठयांच्या शौर्याची यशोगाथा असणाऱ्या 'बलोच' चित्रपटात प्रसादने खलनायक साकारला आहे. त्याने साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेला जनसामान्यांतून उस्फूर्त त्याला दाद व प्रतिसाद मिळत आहे.मराठी चित्रपटसृष्टीतील नवा खलनायक प्रसाद सुर्वे नावाने ओळख मिळवत आहे. आगामी काळात प्रसादकडे मराठी, हिंदी तसेच दक्षिणेकडे चित्रपटांची रेलचेल आहे. त्याच्या चित्रपटाच्या कारकीर्दीत मिळालेल्या भूमिकांना प्रसादने उत्तमरीत्या त्याने निभावल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com