अभिनेता सुशांतच्या आत्महत्याप्रकरणाला नवे वळण, 'या' व्यक्तींनी दिली धक्कादायक माहिती
बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून 2020 मध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. परंतु, त्यानंतर त्याच्या आत्महत्येवर अनेकांनी शंका निर्माण केल्या. या प्रकरणावर प्रचंड वातावरण तापले होते. मात्र, अद्यापही सुशांत आत्महत्याप्रकरणी आजही अनेक अशा गोष्टी समोर येत आहेत. दोन वर्षांनी अभिनेत्याचं शवविच्छेद करणाऱ्या रुपकुमार शाह यांनी मोठा खुलासा केला आहे.
सुशांतच्या निधनानंतर त्याला कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आलं. त्यावर शवविच्छेद करणारे रुपकुमार शाह यांनी सुशांतची आत्महत्या नसून हत्याच असल्याचा मोठा खुलासा केला आहे. रुपकुमार शाह म्हणाले की, जेव्हा सुशांतचं निधन झालं तेव्हा शवविच्छेदनासाठी पाच मृतदेह आले होते. त्यामध्ये एक व्हीआयपी मृतदेह असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं, पण कोण आहे हे सुरुवातीला कळालं नव्हतं. जेव्हा मृतदेहावरचा कपडा कढला तेव्हा शरीरावर मारहाणीच्या खूणा होत्या. गळ्यावर दोन-तीन वर्ण होते. हात-पाय मार लागून तुटल्यासारखे म्हणजे मुक्का मार लागल्यानंतर होणाऱ्या खुणा शरीरावर होत्या. व्हिडीओ शुटिंग व्हायला हवी होती, पण ती झाली की नाही किंवा केली नाही. वरिष्ठांना देखील सांगण्यात आलं होतं फक्त फोटोग्राफवर काम करायचं. म्हणून आम्ही त्यावर काम केलं.
पुढे शाह म्हणाले की, जेव्हा मी सुशांतचा मृतदेह पाहिला तेव्हा मी की वरिष्ठांना सांगितलं, ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचं मला वाटतं. त्यामुळे आपण त्या पद्धतीने काम करायला हवं. असं मी वरिष्ठांना सांगितलं. पण ते म्हणाले लवकरात-लवकर फोटोंवर काम करायचं आहे आणि मृतदेह द्यायचा आहे. त्याप्रमाणे आम्ही रात्री शविच्छेदन केलं. असे देखील शाह यावेळी म्हणाले.