अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंडकडून छळ; फोटो केले शेअर

अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंडकडून छळ; फोटो केले शेअर

मल्याळम अभिनेत्री अनिका विक्रमनने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यांवर अनेक जखमा दिसून येत आहेत.

मल्याळम अभिनेत्री अनिका विक्रमनने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यांवर अनेक जखमा दिसून येत आहेत. याचा खुलासाही तिने फेसबुक पोस्टद्वारे केला आहे. अनिकाने एक्स बॉयफ्रेंड अनूप पिल्लईवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच या प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी अनूपने पोलिसांना लाच दिल्याचा दावाही अनिकाने केला आहे.

अनिका विक्रमन म्हणाली की, मी अनूप पिल्लई नावाच्या व्यक्तीला डेट करत होते. परंतु, त्याने माझा शारिरीक व मानसिक छळ केला. त्याच्यासारखा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. माझा एवढा छळ करूनही तो मला धमकावत आहे. मी माझ्या स्वप्नातही विचार केला नव्हता की तो माझ्यासोबत असे काही करेन. या गोष्टींनी सोडून दिल्यानंतरही मला धमकीचे फोन येत आहेत. माझा आणि माझ्या कुटुंबाचा अपमान केला जात आहे.

चेन्नईमध्ये त्याने पहिल्यांदा अत्याचार केल्याचा आरोप अनिका केला आहे. शूटिंगवर जाण्यापासून रोखण्यासाठी त्याने अनिकाचा फोन तोडला होता आणि तिचे व्हॉट्सअॅप मेसेजही स्नूप केले होते. मी हैदराबादला शिफ्ट होण्याच्या दोन दिवस आधी त्याने माझा फोन लॉक केला आणि मला मारहाण करण्यास सुरुवात केली. माझ्यावर बसून माझे तोंड झाकले. मला ब्राँकायटिस झाला होता. मी जवळजवळ बेशुद्ध पडल्यावर तो मला सोडून गेला. मला वाटले की ही माझ्या आयुष्यातील शेवटची रात्र आहे.

जेव्हा मी माझा चेहरा आरशात पाहिला आणि जोरात रडू लागले, तेव्हा तो जोरात हसत होता आणि तेरा नाटक अच्छा है, असे म्हणू लागला. मारहाण झाल्यानंतर अनूपने त्याच्या मित्रांसोबत पार्टी केली. अनूपने तिला दुसऱ्यांदा मारहाण केल्यावर तिने बेंगळुरूमध्ये पोलिसांकडे तक्रार केली होती. परंतु, त्याने पोलिसांना पैसे देत प्रकरण मिटवण्यास सांगितले, असे अनिकाने सांगितले.

दरम्यान, अनिका विक्रमण विशमकरण (2022), आयकेके (2021) आणि इंगा पट्टन सोथू (2021) मधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com