अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा मृत्यू, घातपाताचा संशय

अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा मृत्यू, घातपाताचा संशय

मराठी चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री भाग्यश्री मोटेची बहीण मधु मार्कंडेय हिचा मृत्यू झाला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री भाग्यश्री मोटेची बहीण मधु मार्कंडेय हिचा मृत्यू झाला आहे. यामुळे भाग्यश्री आणि तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. परंतु, मधूच्या चेहऱ्यावर अनेक जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. यामुळे घातपाताचा संशय कुटुंबियांकडून व्यक्त केला जात आहे.

माहितीनुसार, मधू 12 मार्च रोजी तिच्या मैत्रिणीसोबत भाड्याची खोली पाहण्यासाठी गेली होती. जिथे तिला अचानक चक्कर आली आणि मधूला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार न मिळाल्याने तिला तातडीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मधूला मृत घोषित केले.

मधुच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर वेगवेगळ्या जखमांच्या खुणा असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत तिचा खून झाल्याचा संशय कुटुंबियांना आहे. त्याचवेळी मृतदेहाची स्थिती पाहता पोलीस हत्येच्या दृष्टीकोनातूनही तपास करत आहेत. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

दरम्यान, तीन आठवड्यांपूर्वीच मधू मार्कंडेयच्या नवऱ्याचे संकेत मार्कंडेयचे निधन झाले होते. या दु:खातून सावरत नाही तोच तिच्या बहिणीचाही मृत्यू झाला आहे. मधूला एक लहान मुलगा आणि मुलगी आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com