Rakhi Sawant Mother death
Rakhi Sawant Mother death Team Lokshahi

अभिनेत्री राखी सावंतच्या आईचे निधन

राखी सावंतच्या आई जया या गेल्या ३ वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या.
Published by :
Sagar Pradhan
Published on

सुप्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राखी सावंतची आई जया यांचे आज निधन झाले आहे. त्या ब्रेन ट्युमर आणि कर्करोगाने ग्रस्त होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

राखी सावंतच्या आई जया या गेल्या ३ वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रेन ट्युमरचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांना मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवारी (२८ जानेवारी) रात्री ८.३० च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राखी सावंतने माध्यमाशी संवाद साधताना सांगितले की, तिच्या आईचे निधन झाले आहे. "माँ अब नहीं रंही". असे म्हणत तिने माध्यमांना निधनाबद्दल माहिती दिली. सोबत तिचा पती आदिल दुर्रानी खान यांनी देखील जया यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com