“भारतात खूप  मुली आळशी" त्यांना असा पती किंवा बॉयफ्रेंड हवा जो..." अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली...
Admin

“भारतात खूप मुली आळशी" त्यांना असा पती किंवा बॉयफ्रेंड हवा जो..." अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली...

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या अभिनयाने आणि लूक सर्वांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या अभिनयाने आणि लूक सर्वांच्या मनात जागा निर्माण केली आहे. ती सोशल मिडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसोबत काही व्हिडिओ, फोटो शेअर करत असते.

नुकतेच ती एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहिली होती. त्यातील तिचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हि़डिओमध्ये तीने भारतातील मुलींविषयी मत मांडताना दिसत आहे. ती म्हणाली की, मला घरात भांडणं लावायची नाहीत. मैत्रीण लग्नासाठी मुलगा शोधत होती आणि ५० हजारांपेक्षा कमी पगाराचा मुलगा नकोच, एकटा राहत असेल तर खूपच उत्तम, सासू सासरेही नको आणि त्याच्याकडे कार असावी, असं तिचं म्हणणं होतं. असे ती म्हणाली.

पुढे त्या म्हणाल्या की, भारतात खूप साऱ्या मुली आळशी आहेत. त्यांना असा पती किंवा बॉयफ्रेंड हवा असतो, ज्याच्याकडे चांगली नोकरी, घर असेल, पगार वाढण्याची खात्री असेल. पण त्या मुलीत इतकी हिंमत नसते की ती एखाद्या मुलाला म्हणू शकेल की तू माझ्याशी लग्न केल्यावर मी काय करेन. अशी स्त्री निर्माण करा, जी स्वतःसाठी कमवू शकेल. जी घरात सामान घ्यायचं असेल तर पतीला अर्धे पैसे देऊ शकेल. असे ती म्हणाली. तीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com