काश्मिरमध्ये पठाण चित्रपटामुळे 32 वर्षांनंतर सिनेमागृहात लागला हाऊसफुल्लचा बोर्ड
Admin

काश्मिरमध्ये पठाण चित्रपटामुळे 32 वर्षांनंतर सिनेमागृहात लागला हाऊसफुल्लचा बोर्ड

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. पठाणच्या पहिल्या दिवसाचे जगभरातील कलेक्शनही येऊ लागले असून या चित्रपटाने जगभरात १०० कोटींहून अधिक कमाई केल्याचे संकेत मिळत आहेत.

यानुसार शाहरुख खानने तोच बॉक्स ऑफिसवरील बादशहा असल्याचे दाखवून दिले आहे. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण चित्रपट 'पठाण' ने काश्मीरमध्ये आपली जादू दाखवली आहे.

आयनॉक्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट शेअर करुन काश्मिर खोऱ्यातील थिएटर हाऊसफुल्ल झाल्याची माहिती देण्यात आली आहे. '32 वर्षांनंतर काश्मीर खोऱ्यातील थिएटरमध्ये हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. आम्ही किंग खानचे आभारी आहोत! धन्यवाद', असं या ट्वीटमध्ये लिहिण्यात आलं आहे. 32 वर्षांनंतर 'हाऊसफुल' बोर्ड लागला. मल्टिप्लेक्स चेन INOX Leisure Ltd ही माहिती दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com