ED summoned Aishwarya : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ईडीच्या कार्यालयात दाखल, ईडीने बजावले होते समन्स

ED summoned Aishwarya : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ईडीच्या कार्यालयात दाखल, ईडीने बजावले होते समन्स

Published by :

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या दिल्ली कार्यालयात हजर झाली. ऐश्वर्या दुपारी दीड वाजता ईडीच्या कार्यालयात पोहोचली असून तिची चौकशी सुरु आहे. परदेशात संपत्ती जमा केल्याच्या आरोपावरुन तपास एजन्सीने दिल्लीतील 48 वर्षीय अभिनेत्रीचे जबाब नोंदवल्याचे सूत्रांनी सांगितले. मेगास्टार अमिताभ बच्चन यांची सून आणि अभिषेक बच्चनची पत्नी ऐश्वर्या यांना काही वेळापूर्वी समन्स बजावण्यात आले होते परंतु त्यांनी हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com