Amruta Fadnavis
Amruta FadnavisTeam Lokshahi

अज मैं मूड बणा...! अमृता फडणवीसांचं नवं गाणं लवकरच; हटके लूकची तुफान चर्चा

अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्यातील हटके लूकची सध्या तुफान चर्चा.
Published by :
shamal ghanekar

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadnavis) सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असतात. आपल्या गाण्यांसाठी त्या लोकप्रिय आहेत. आता त्यांचं आणखी एक नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. "अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!!" असे या गाण्याचे बोल आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन या गाण्याबाबत माहिती दिली.

Amruta Fadnavis
या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी विरोधीपक्षाला उघड पडलं - देवेंद्र फडणवीस

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. तसेच आपला एक फोटो देखील शेअर केला आहे. अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्यातील हटके लूकची सध्या तुफान चर्चा रंगली आहे. येत्या 6 जानेवारीला 'टी सीरिज'चं हे गाणं प्रदर्शित होणार आहे. नवीन गाणं हे बॅचलर्सवर आधारित असल्याचं अमृता यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. हटके लूकमुळे लोकांमध्ये गाण्याबद्दलची उत्सुकता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com