अजय देवगणच्या 'भोला'चा दमदार ट्रेलर रिलीज

अजय देवगणच्या 'भोला'चा दमदार ट्रेलर रिलीज

'दृश्यम 2'च्या प्रचंड यशानंतर चाहते अभिनेता अजय देवगणच्या 'भोला'ची आतुरतेने वाट पाहत होते.

'दृश्यम 2'च्या प्रचंड यशानंतर चाहते अभिनेता अजय देवगणच्या 'भोला'ची आतुरतेने वाट पाहत होते. 'भोला' या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. अजय देवगणने भोला या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. यामध्ये भरपूर अॅक्शन आणि रोमांच पाहायला मिळत आहे.

'भोला' ही वडील-मुलीच्या नात्याची अप्रतिम कथा आहे. 'भोला'मध्ये बॉलीवूड अभिनेत्री तब्बू पुन्हा एकदा पोलिसाच्या भूमिकेत आपला दम दाखवताना दिसत आहे. भोलाचा ट्रेलर शेअर करताना अजयने 'लढाई धैर्याने जिंकली जाते, संख्या, शक्ती आणि शस्त्रांनी नाही, असे इंस्टाग्रामवर लिहिले आहे. अजय देवगणचा भोला हा साऊथ सुपरस्टार कार्तीचा सुपरहिट चित्रपट 'कैथी'चा अधिकृत रिमेक असल्याची माहिती आहे. अजय देवगण आणि तब्बू स्टारर हा चित्रपट या महिन्यात 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com