Drishyam 2 Teaser
Drishyam 2 TeaserTeam Lokshahi

Drishyam 2 Teaser : अजय देवगण पुन्हा पोलिसांच्या डोळ्यात फेकणार धूळ, 'दृश्यम 2'चा टीझर उद्या होणार रिलीज

अजय देवगणने 'दृश्यम 2' ची घोषणा केली होती. आणि आता 'दृश्यम 2' चा फर्स्ट लूक समोर आला आहे

2015 साली रिलीज झालेला अजय देवगणचा 'दृश्यम' हा चित्रपट आजही लोकांच्या मनात घर करून आहे. चित्रपटाच्या कथेपासून ते अजय देवगण आणि तब्बूच्या अभिनयापर्यंत प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. आजही ऑक्टोबर महिन्यात 'दृश्यम'चे डायलॉग्स लोकांच्या ओठावर रुळतात. आता पुन्हा एकदा अजय देवगण चाहत्यांना एक मोठी भेट देणार आहे. अलीकडेच त्याने 'दृश्यम 2' ची घोषणा केली होती. आणि आता 'दृश्यम 2' चा फर्स्ट लूक समोर आला आहे, ज्यामध्ये 'साळगावकर कुटुंब' पुन्हा एकदा पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्याच्या तयारीत आहे.

दृश्यम 2 टीझर'चा फर्स्ट लूक शेअर करताना अजय देवगणने कॅप्शनमध्ये लिहिले की, "2 किंवा 3 ऑक्टोबरला काय घडले ते लक्षात ठेवा? विजय साळगावकर पुन्हा एकदा आपल्या कुटुंबासह परतले आहेत." यासोबतच अजय देवगणने सांगितले की, 'दृश्यम 2' चा टीझर उद्या म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.अजय देवगणच्या या पोस्टवर लोक भरपूर कमेंट करत आहेत.

दृश्यम 2' या दिवशी रिलीज होणार आहे

'दृश्यम 2'च्या पोस्टरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही नमूद करण्यात आली आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी 18 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. अजय देवगण, तब्बू, रजत कपूर, श्रेया सरन आणि इशिता दत्ता मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय आणखी एका अभिनेता अक्षय खन्ना याचं नावही या चित्रपटात सामील झालं आहे.

जय देवगणच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'थँक गॉड' चित्रपटात काम करताना दिसणार आहे. इंदर कुमार दिग्दर्शित हा चित्रपट 24 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Drishyam 2 Teaser
Ranbir Kapoor Bday : पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असलेला रणबीर कपूर या अभिनेत्याच्या एक्स पत्नीवर होता क्रश
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com