Akshay Kumar
Akshay KumarTeam Lokshahi

Akshay Kumar : कॅनडाला जाण्याबद्दल अक्षयचा मोठा निर्णय ?

अक्षयने स्वतःच्या नागरिकत्वाबद्दल खुलासा करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार(Akshay Kumar)यांचा 'रक्षा बंधन' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या व्यवसायात 30 टक्क्यांनी घसरण झाली. आता बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दरम्यान अक्षयचे एक जुने विधान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने म्हटलेलय की जर त्याचे चित्रपट फ्लॉप होत राहिले तर तो भारत सोडून कॅनडाला जाईल.

चित्रपट चालले नाहीत तर अक्षय करत होता कॅनडाला जाण्याचा विचार

अक्षयला अनेकदा 'कॅनेडियन कुमार' म्हणत ट्रोलही केले जातं. अक्षयने नुकतच एका मुलाखती दरम्यान सांगितलं की भारतात कर भरत असतानाही त्याच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे. 2019 मध्ये कॅनडाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केल्यानंतर आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान सोडल्यानंतर अक्षयवरही बरीच टीका झाली होती. त्यानंतर अभिनेत्याने असेही म्हटले होते की त्याचे चित्रपट चालले नाहीत म्हणून तो कॅनडाला जाण्याचाही विचार करत होता.

अक्षयने आपल्या नागरिकत्वाबद्दल खुलासा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 'कॉफी विथ करण 7' या शोमध्ये करण जोहरने त्याला विचारले की ट्रोलर्स तुम्हाला कॅनडा कुमार का म्हणतात? यावर उत्तर देत अक्षयने सांगितलं की "हो मी कॅनडा कुमारही ठीक आहे. तुम्ही देखील मला या नावाने बोलवू शकता. अक्षयने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सांगितले की तो एक भारतीय आहे जो नेहमीच असाच राहणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com