'चंद्रमुखी' नंतर 'कलावती' च्या देखण्या सौदर्यांने घायाळ करायला येतेयं अमृता खानविलकर

'चंद्रमुखी' नंतर 'कलावती' च्या देखण्या सौदर्यांने घायाळ करायला येतेयं अमृता खानविलकर

अभिनेत्री अमृता खानविलकल हिने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस लूकने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकल हिने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस लूकने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाने प्रेक्षकांची चांगलीच मनं जिंकली. अमृता खानविलकरने साकारलेल्या चंद्रमुखीने सगळ्यांनाच अक्षरशः वेड लावलं होतं. अमृताच्या अदांनी सगळेच घायाळ झाले होते.

आता पुन्हा एकदा आपल्या सौदर्यांने घायाळ करायला कलावती म्हणजेच अमृता खानविलकर सज्ज झाली आहे. नुकतेच अमृताने नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.अमृता खानविलकर येणाऱ्या काळात 'कलावती' या सिनेमात झळकणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव हा सिनेमा दिग्दर्शित करत असून त्याचे पोस्टर सोशल मिडियावर रिलीज करण्यात आले आहे.

या चित्रपटात अमृता खानविलकर, संजय नारवेकर, तेजस्विनी लोणारी, हरिष दुधाणे हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत तर ओंकार भोजने, दीप्ती धोत्रे आणि युट्यूबर नील सालेकरही यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com