'अमूल' तर्फे आलिया,रणबीर आणि त्यांच्या गोंडस बाळाला अनोखी भेट: पहा काय आहे ही भेट?

'अमूल' तर्फे आलिया,रणबीर आणि त्यांच्या गोंडस बाळाला अनोखी भेट: पहा काय आहे ही भेट?

अमुलच पोस्टर सध्या सोशल मिडीयावर चांगलाच होतोय वायारल.

एका गोंडस कन्यारत्नाला जन्म देऊन आलिया, रणबीरने नुकताच आपल्या प्रेक्षकांना सुखद धक्का दिला. आपल्या सोशल मिडीयावर एक पोस्ट टाकून आलियाने बाळाच्या आगमाची गोड बातमी जाहीर केली. त्याआधीच आलीयाचे डोहाळजेवण फारच चर्चेत होते तिचे डोहाळजेवण फारच जल्लोषात पार पडले. तिच्या डोहाळ जेवणाच्या फोटोजला चाहत्यांचा फारच चांगला प्रतिसाद पाहायला मिळला. चाहत्यांना बाळाच्या आगमनाची बातमी कळताच चाह्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळतंय.

याच आनंदात भर घालत आता 'अमूल' ने आलिया, रणबीर ला अतिशय गोड अशी एक भेट दिली. कोणतीही एखादी मोठी घटना घडली की 'अमूल' त्यासंदर्भात एक छानसं कार्टून पोस्टर बनवून त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटच्या माध्यमातून शेअर करतं. अश्याच अंदाजातल एक गोड कार्टून पोस्टर आपल्या सोशल मिडिया मार्फत शेअर करून नवजात बाळाचे स्वागत अमुलने केले . त्या पोस्टर मध्ये आलिया, रणबीर, त्यांचे बाळ आणि आलिअने तिच्या सोशल मिडीयावर पोस्ट केलेले एक पोस्टरचा वापर करून अतिशय सुरेख पोस्टर 'अमूल'ने पोस्ट केले. हे पोस्टर शेअर करत अमूलने लिहिलं कि, “स्टार जोडप्याच्या पोटी एका गोड कन्यारत्नाने जन्म घेतला आहे.” 'अमूल'च्या या कल्पनेला आलिया, रणबीरने सुद्धा दाद दिली.

'अमूल' तर्फे आलिया,रणबीर आणि त्यांच्या गोंडस बाळाला अनोखी भेट: पहा काय आहे ही भेट?
Photo Gallery: आलिया-रणबीरची प्रेमकहाणी...

सध्या हे पोस्टर सोशल मिडीयावर कमालीचे वायरल होत आहे. अमुलचा सर्वं पोस्टर पैकी सर्वात सुंदर पोस्टर ,म्हणून या पोस्टर ला प्रेक्षकांनी दाद दिली.आता नवजात बाळाचे स्वागत कपूर कुटुंबीय कश्याप्रकारे करतात, व बाळाचे काय नाव ठेवतात यावर चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com