निळू फुलेंचं आयुष्यावर येणार बायोपिक; प्रसाद ओक करणार दिग्दर्शन!
Admin

निळू फुलेंचं आयुष्यावर येणार बायोपिक; प्रसाद ओक करणार दिग्दर्शन!

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते निळू फुले. अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता-निर्माता-दिग्दर्शक प्रसाद ओक करणार आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 2023मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी सुरु झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते निळू फुले. अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता-निर्माता-दिग्दर्शक प्रसाद ओक करणार आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 2023मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी सुरु झाली आहे.

निळू फुले यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रसाद ओक यानेही या चित्रपटाची घोषणा केली होती.प्रसाद ओकने गेल्या वर्षी या चित्रपटाची घोषणा केली होती. त्याने याची माहिती गेल्यावर्षी सोशल मिडियावरुन दिली होती आणि खास पोस्ट देखिल लिहिली होती. त्याने लिहिले होते की, ‘निळूभाऊ...आज तुमचा वाढदिवस...तुमच्या सहवासातली ती दोन अडीच वर्ष माझ्या आयुष्यातली सर्वात अविस्मरणीय होती भाऊ. तुम्हाला खूप जवळून पाहता आलं...अनुभवता आलं... तुमच्याकडून बरंच काही शिकलो... तुम्हाला न सांगता तुम्हाला मनोमन "गुरु"च मानलं...तुमचा आशीर्वाद म्हणूनच की काय तुमच्यावरचा जीवनपट दिग्दर्शित करण्याची संधी मला मिळाली आहे. हि संधी मला @tips.marathiनी दिली त्याबद्दल @tipsचे, @tips.marathi चे आणि @kumartaurani यांचे मनःपूर्वक आभार...!!! हा फक्त एक चित्रपट नसेल तर मी तुम्हाला दिलेली "गुरुदक्षिणा" असेल...!!! फक्त पाठीवर तुमचा हात कायम राहू द्या भाऊ...!!!’ अशी खास पोस्ट त्याने लिहिली होती.

रमेश यांची टिप्स कंपनी हा चित्रपट बनवणार आहे. लवकरच या चित्रपटाचे काम सुरू होणार असून या चित्रपटाती निर्मिती टिप्स कंपनी करणार आहे.या चित्रपटात निळू फुले यांची भूमिका साकारण्यासाठी कलाकाराचा शोध सुरु झाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com