Ankita Lokhande
Ankita Lokhande

अभिनेत्री Ankita Lokhande आई होणार? साडीतील पोजमध्ये लपवले बेबीबम्प?

Ankita Lokhande Pregnant : टीव्ही मालिकांमधून चित्रपटसृष्टीमध्ये आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या चर्चेत आली आहे.

टीव्ही मालिकांमधून चित्रपटसृष्टीमध्ये आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या चर्चेत आली आहे. सोशल मिडीयावर अंकिताचे प्रचंड फॉलोअर्स आहेत. यातच तिने काही फोटो शेअर केले आणि नेटकऱ्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला आहे. अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका साडीतील फोटो शेअर केले ज्यामध्ये ती तिच पोट लपवताना दिसली. तर तिचे बेबीबम्प देखील दिसल्याचे काही चाहत्यांनी म्हटले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अंकिताच्या प्रेगनंट असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता पर्यंत अंकिता किंवा पती विक्कीने यावर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यानंतर आता या फोटोंमुळे मात्र या चर्चांना आणखीनच उधान आले आहे. या फोटोमध्ये अंकिता साडी नेसलेली असून ती पोट झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. तिने मेहंदी कलरची साडी नेसली आहे. कानात झुमके, हातात पर्स आणि केसांचा बन घातला आहे.

मात्र ती कधी पर्सने तर कधी हाताने पोट झाकत आहे. त्यामुळे अंकिता लवकरच गुडन्यूज देणार आहे असा अंदाज नेटकऱ्यानी लावला असून तशा कमेंट्स पाऊसच चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर केला आहे. 2021 मध्ये अंकिताने बिजनेसमन विक्की जैनशी विवाह केला. त्यानंतर नेहमीच हे कपल सोशल मिडीयावर कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतं. विविध क्षणांचे फोटो देखील ते शेअर करत असतात.

दरम्यान दिवंगत अभिनेता सुशांत सिंग रजपूत आणि अंकिता लोखंडे यांच देखील नात त्यांनी अनेकदा जाहिर केलं होत. मात्र त्यानंतर ते विभक्त झाले. तर अभिनेता सुशांत सिंग रजपूतच्या संशयीत मृत्यूच्यावेळी अंकिता पुन्हा एकदा प्रचंड चर्चेत आली होती. सुशांत सिंग रजपूत आणि अंकिता लोखंडे यांनी पवित्र रिश्ता या मालिकेत एकत्र काम केलं होतं. तर याच मालिकेमुळे अंकिता घराघरात पोहचली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com