Annu Kapoor
Annu KapoorTeamLokshahi

अन्नू कपूर रुग्णालयात दाखल, तब्येतीचे अपडेट समोर आले

अभिनेता व गायक अन्नू कपूरच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी

अभिनेता व गायक अन्नू कपूरच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी येत आहे. अन्नू कपूर यांना छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अन्नू कपूरचे मॅनेजर सचिन यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

अन्नू कपूर यांच्या छातीत जळजळ होत असल्याने २६ जानेवारीला सकाळी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर कार्डिओलॉजीचे डॉक्टर सुशांत उपचार घेत आहेत. यावेळी अन्नू कपूरची प्रकृती स्थिर असून प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, अन्नू कपूर यांनी 1979 मध्ये करिअरला सुरुवात केली. रंगमंचावर कलाकार म्हणून ते प्रेक्षकांसमोर आले. यानंतर ते 'मंडी' चित्रपटात झळकले होते. अन्नू कपूरने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक चित्रपट केले आहेत. याशिवाय अन्नू कपूर हे त्यांच्या सर्वोत्तम कॉमिक टायमिंगसाठीही ओळखले जातात. एवढेच नाही तर त्याने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. अन्नू कपूरला 'विकी डोनर' या चित्रपटासाठी फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. सध्या अन्नू कपूर 92.7 रेडिओ एफएम शो होस्ट करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com