Sahi Galat Drishyam 2
Sahi Galat Drishyam 2Team Lokshahi

दृश्यम 2 मधील आणखी एक गाणे रिलीज, तुम्ही ऐकलंय का?

अभिनेता अजय देवगणचा 'दृश्यम 2' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे.

अभिनेता अजय देवगणचा 'दृश्यम 2' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. आता या, चित्रपटा मधील आणखी एक गाणे रिलीज झाले आहे.

Sahi Galat Drishyam 2
Drishyam 2 : दृश्यम 2 मधील पहिले गाणे रिलीज...

'सही गलत' हे या चित्रपटातील तिसरे गाणे रिलीज झाले आहे. विविध छटा दाखवताना हे गाणे रॉकस्टार डीएसपी (देवी श्री प्रसाद) यांनी संगीतबद्ध केले आहे. जे राजाने गायले आहे आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे.

2 आणि 3 ऑक्टोबरला काय झालंय माहिती आहे ना? विजय साळगांवकर पुन्हा येतोय त्याच्या कुटुंबासोबत,असं म्हणत या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली जात आहे. या दोन दिवसांत नक्की काय झालं होतं, याचं उत्तर आता 'दृश्यम 2' मध्ये प्रेक्षकांना मिळलं आहे.

या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त श्रिया सरन, तब्बू, इशिता दत्ता, रजत कपूर आणि मृणाल जाधव दिसणार आहेत. हा चित्रपट यावर्षी 18 नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com