Anupam Kher
Anupam KherTeam Lokshahi

'या' अभिनेत्याची 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटात झाली एन्ट्री

विवेक रंजन अग्निहोत्री यांचा आगामी चित्रपट 'द व्हॅक्सिन वॉर'ची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे.

विवेक रंजन अग्निहोत्री यांचा आगामी चित्रपट 'द व्हॅक्सिन वॉर'ची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे. तसेच, या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले असून, सिनेमातील मुख्य कलाकारांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दर्शक उत्सुक आहेत. अशातच, चित्रपटाच्या मुख्य कलाकामध्ये आता अभिनेता अनुपम खेर यांचेही नाव सामील झाले आहेत. तसेच, 'द व्हॅक्सिन वॉर'हा त्यांचा 534वा चित्रपट आहे.

अलीकडेच नाना पाटेकर 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याचे निश्चित झाले असून लखनऊमध्ये ते या चित्रपटाचे शूटिंग करत होते. अशातच, अनुपम खेर देखील आता या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये सामील झाले आहेत. या दिग्गज कलाकारांना पडद्यावर एकत्र पाहणे विशेष आणि रोमांचक ठरणार आहे.

पल्लवी जोशी निर्मित विवेक रंजन अग्निहोत्री यांचा आगामी चित्रपट 'द व्हॅक्सिन वॉर' स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली यांसह १० हून अधिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com