'द कश्मीर फाइल्स' हा एक बोगस सिनेमा; प्रकाश राज यांचा विधानाला अनुपम खेर यांचे उत्तर

'द कश्मीर फाइल्स' हा एक बोगस सिनेमा; प्रकाश राज यांचा विधानाला अनुपम खेर यांचे उत्तर

द कश्मीर फाइल्स हा एक बोगस सिनेमा आहे. पण या सिनेमाची निर्मिती कोणी केली आहे याची आम्हाला कल्पना आहे.

द कश्मीर फाइल्स चित्रपट येऊन अनेक महिने उलटले मात्र, अद्यापही या चित्रपटावरून वाद सुरूच आहेत. हा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतानाही हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला व आजही तेवढ्याच चर्चेत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा हा चित्रपट वादात आला आहे. केरळ चित्रपट महोत्सवात अभिनेता प्रकाश राज यांनी या सिनेमावर टीका केली त्यावरच अभिनेते अनुपम खेर यांनी उत्तर दिले आहे.

अनुपम खेर यांचे उत्तर

प्रकाश राज यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, लोक त्यांचे मत मांडत असतात. काहींना आयुष्यभर खोटं बोलावा लागतं. तर काही मंडळी मात्र कायम खरं बोलतात आणि मी या खरं बोलणाऱ्या लोकांपैकी एक आहे. खरं बोलून आयुष्य जगणाऱ्या लोकांमध्ये माझी गणना होते. खोटं बोलून आयुष्य जगणं मला आवडत नाही.

सोबतच विवेक अग्निहोत्री यांनी देखील या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले द कश्मीर फाइल्स'नंतर अनेक लोक अस्वस्थ झाले आहेत. मला भास्कर कसा मिळेल? हा तुमचा आहे. तो कायम तुमचाच राहील". असे ते म्हणाले.

प्रकाश राज काय म्हणाले होते?

केरळ चित्रपट महोत्सवादरम्यान प्रकाश राज म्हणाले,द कश्मीर फाइल्स' हा एक बोगस सिनेमा आहे. पण या सिनेमाची निर्मिती कोणी केली आहे याची आम्हाला कल्पना आहे. अशा सिनेमाचं कौतुक होणं ही फार गंभीर बाब असून या सिनेमाचे दिग्दर्शक म्हणत आहेत, आमच्या सिनेमाला ऑस्कर का मिळत नाही?". या सिनेमाला भास्करदेखील मिळणार नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com