गौतमीसाठी काय पण! गावात येणार म्हणून केला 
थेट सुट्टीचा अर्ज; काय आहे नेमके सत्य?

गौतमीसाठी काय पण! गावात येणार म्हणून केला थेट सुट्टीचा अर्ज; काय आहे नेमके सत्य?

गौतमी पाटीलला ओळखत नाही असा माणूस महाराष्ट्रात तरी सापडणं कठीण आहे. गौतमीचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणात आहे.

गौतमी पाटीलला ओळखत नाही असा माणूस महाराष्ट्रात तरी सापडणं कठीण आहे. कारण लहानांपासून तर साठीला टेकलेल्या म्हाताऱ्यानं सुद्धा गौतमीचा डान्स पाहिलाय. गौतमीचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. सुरुवातीला आक्षेपार्ह डान्समुळं चर्चेत आलेल्या तिला संपूर्ण महाराष्ट्रात ओळख मिळाली. गौतमी नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. अशात, ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. परंतु, यावेळी ती डान्समुळे नव्हेतर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.

सांगलीमधील एका पठ्ठ्याने गौतमी पाटील गावात येणार म्हणून थेट सुट्टीसाठी अर्ज केला आहे. हा रजेचा अर्ज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तासगावमधील एसटी आगारातील चालक प्रकाश यमगर यांनी हा रजेचा अर्ज आगार प्रमुखांकडे केला आहे. या अर्जात गौतमी पाटील गावात येणार आहे म्हणून दोन दिवस रजा मिळावी, अशी विनंती प्रकाश यमगर यांनी केली आहे. या अर्जाची चर्चा आता सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रात रंगाताना दिसत आहे.

परंतु, हा अर्ज खोटा असून कोणीतरी खोडसाळपणा करण्यासाठी व्हायरल केल्याचे प्रकाश यमगर यांनी म्हंटले आहे. तर, असा कोणताही अर्ज मिळाला नसल्याचे वरिष्ठांनीही स्पष्ट केले आहे.

दरम्यान, गौतमी पाटील आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'घुंगरु' या चित्रपटातून गौतमी सिनेसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टिझरमधून चित्रपटाची कथा ही लावणी कलावंताच्या जीवनावर आधारित असून यात गौतमी पाटीलचा डान्स पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com