Apurva Nemlekar
Apurva NemlekarTeam Lokshahi

अक्षय केळकर विजेता ठरल्यानंतर अपुर्वाची चाहत्यांसाठी खास पोस्ट; म्हणाली, प्रवास संपला...

बिग बॉस चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकर ठरला आहे. यानंतर अपुर्वाने चाहत्यांसाठी पोस्ट शेअर केली आहे.

गेल्या तीन महिन्यापासून घराघरात गाजत असलेल्या कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी शोची आज अखेर सांगता झाली. मागील काही दिवसांत या खेळाने आपले भरभरून मनोरंजन केले. अखेर 100 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकर ठरला आहे. यानंतर अपुर्वा नेमळेकरने चाहत्यांसाठी पोस्ट शेअर केली आहे.

अपूर्वा आणि अक्षय केळकर हे दोन स्पर्धक शेवटच्या टप्प्यात होते. यात अक्षय केळकरने बाजी मारली आहे. अपूर्वा नेमळेकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहे. प्रवास संपला तरीही तुमचं प्रेम काही कमी झालं नाही अपूर्वा आर्मी आणि माझ्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार! हा प्रवास तुमच्या शिवाय अपूर्ण आहे, असे तिने पोस्टमध्ये म्हंटले आहे. यावर चाहत्यांनी कमेंटसचा पाऊस पाडला आहे.

एका युजरने म्हंटले की, ती बिग बॉसमध्ये आली, ती भिडली, ती खेळली, ती नडली, ती रडली, ती स्वतःच्या मतावर ठाम राहून, रोखठोक बोलून, घडोघडी न रडता, कोणाची सहानभूती न घेता तीने जिंकून घेतलं. अपूर्वा मानलं तुला, तू मनाने आणि खेळाने स्वतःला खेळाडू म्हणून वारंवार सिद्ध केल आहेस. तर, दुसऱ्याने आमच्यासाठी तूच विजेती आहेत. तू अक्षयपेक्षा जास्त पात्र आहेस, अशी कमेंट केली आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com